MaharashtraCoronaEffect : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला करोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला करोनाची लागण झाली आहे. वरुणने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणला करोनाची लागण झाली. या चित्रपटात वरुणसोबतच नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान अभिनेत्री नीतू कपूरसुद्धा शूटिंगवरून मुंबईला परतल्या. त्यांना परत आणण्यासाठी रणबीर कपूरने योग्य ती प्रवासाची सोय केली. तर वरुण चंदीगडमध्येच क्वारंटाईनमध्ये राहत आहे. वरुणसोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता चंदीगडमध्येच आहेत.
‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या टीमसोबत व्हिडीओ कॉलवर बोलतानाचा स्क्रिनशॉट वरूणने पोस्ट केला. त्यासोबत लिहिलं, ‘करोना काळात काम करत असताना मला करोना व्हायरसची लागण झाली. निर्मात्यांकडून सर्व काळजी घेण्यात आली होती पण आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या.’