MaharashtraCoronaUpdate : नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

गेल्या २४ तासात राज्यात आज ४ हजार ७५७ नवीन रुग्ण आढळले असून ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाला आहे . दरम्यान आज ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ९२ टक्क्यांवर स्थिरावलेला रिकव्हरी रेट वाढून आज ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. तर राज्याचा कोरोना मृत्यूदर सध्या २.५८ टक्के इतका झाला आहे.
राज्यात आज 4757 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7486 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1723370 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 80079 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.08% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 6, 2020
राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख २३ हजार ३७० करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०४ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ७३ हजार ७०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५२ हजार २६६ (१६.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ९०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दरम्यान राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या (अॅक्टिव्ह रुग्ण) करोना बाधितांचा आकडा ८० हजार ७९ पर्यंत खाली आला आहे. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १५ हजार ४२३, ठाणे जिल्ह्यात १४ हजार ४४१ तर मुंबई पालिका हद्दीत १४ हजार ५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. करोनासाठी हे तीन प्रमुख हॉटस्पॉट ठरले असून तिन्ही ठिकाणी नवीन रुग्णसंख्येत सातत्याने घट पाहायला मिळत आहे.