MaharashtraCoronaUpdate : राज्यात गेल्या २४ तासात आढळले ४ हजार ९२२ नवे रुग्ण, ९५ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 4922 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5834 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1715884 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.88% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 5, 2020
राज्यात गेल्या २४ तासात ४ हजार ९२२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील २४ तासात ५ हजार ८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ लाख १५ हजार ८८४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ५ हजार ११८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४७ हजार ५०९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ६८५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८२ हजार ८४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४ हजार ९२२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ९५ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या काळातील आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.