PuneNewsUpdate : अल्पवयीन मुलीवर बलात्कार , दोघांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी, तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत सुद्धा पीडित मुलगी नुकसानभरपाई मिळवू शकते, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
गणेश उर्फ सिद्धू विलास भालेराव ( वय – २७), सुधीर छत्रभूज गायकवाड ( वय -२७, रा. मुळानगर, जुनी सांगवी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती. वडिलांसोबत दारू पिण्यासाठी येणाऱ्या दोघांनी या मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आजीने फिर्याद दाखल केली होती. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुनील मोरे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले.