IndiaNewsUpdate : निवृत्त न्यायमूर्ती सी.एस. कर्णन यांना अटक

न्यायालयाचा अवमान प्रकरणात शिक्षा भोगलेले निवृत्त न्यायमूर्ती सी.एस. कर्णन यांना चेन्नई पोलिसांनी आज अटक केली असल्याचे वृत्त आहे . विद्यमान न्यायाधीशांच्या पत्नी आणि महिला न्यायाधीश यांच्या विरोधात अपमानकारक टिपणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चेन्नई हायकोर्टाने याची गंभीर दखल घेत तामिळनाडू पोलिसांना त्यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल फटकारले होते. त्यावरून आज ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वीही जस्टीस सी.एस. कर्णन वादग्रस्त राहिलेले आहेत . ९ मे २०१७ ला सात न्यायमूर्तींच्या बेंचने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. सहा महिन्याची शिक्षा भोगल्यानंतर ते बाहेर आले होते. दरम्यानच्या काळात न्यायाधीशांच्या पत्नी आणि महिला न्यायाधीश यांच्या संदर्भात त्यांनी ऑनलाईन पोस्टमध्ये आक्षेपार्ह टिपणी केल्या होत्या.