GujratNewsUpdate : आशिक पटेलची अशीही आशिकी , गाडीला मनपसंत नंबर मिळविण्यासाठी लावली ३४ लाखांची बोली !!

अहमदाबादमधील आशिक पटेलची आशिकी ३९ .५० लाखांच्या एसयूव्ही कारच्या नंबर प्लेटसाठी इतकी मेहेरबान झाली कि या पट्ठ्याने केवळ आपल्या आवडत्या नंबरसाठी तब्बल ३४ लाख रुपये खर्च करून हवा तो नंबर घेतला आहे. आणि हा नंबर आहे ००७. वाहतूक व्यावसायिक असलेला हा आशिक पटेल जेम्स बॉन्डचा चाहता आहे. आशिकने 39.50 लाखांची फॉर्च्युनर (Toyota Fortuner SUV VIP Number) कार खरेदी केली. या गाडीला 007 हा नंबर घ्यायचा हे त्यांच्या डोक्यात होतं. मात्र हा नंबर सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी 007 या नंबरसाठी चक्क ३४ लाख रुपये मोजले आहे.
आशिकच्या या आशिकीबाबत अहमदाबाद आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, एका फॅन्सी नंबर प्लेटसाठी ३४ लाखांची बोली लागली होती. गेल्या काही दिवसातील सर्वात मोठी रक्कम आहे. ही संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर आशिक पटेल यांना त्यांच्या आवडीची नंबर प्लेट दिली जाणार जाणार आहे.
विशेष म्हणजे कोरोना काळात देशात सर्वत्र उद्योजक -व्यापाऱ्यांच्या आर्थिक अडचणीची चर्चा होत असताना हि बोली लागली आहे . आरटीओच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या लिलावात भाग घेऊन बोली लावणाऱ्यांची संख्या १०० पेक्षा कमी झाली होती. ००७ या नंबर शिवाय २४ नंबरसाठी ६२२ जणांनी बोली लावली. त्यात ‘१०१ ‘या फॅन्सी क्रमांकासाठी दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी ५.६५ लाखांची बोली लागली आणि त्यानंतर ०३६९ या नंबरसाठी १.४० लाखांची बोली लागली आहे.