AurangabadNewsUpdate : मराठवाडा पदवीधर निवडणुक Live : ताजी बातमी : औरंगाबाद विभागात अंदाजे 64.49 टक्के मतदान

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी आठपासून सायं. पाच वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अंदाजे 63.05 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळपर्यंत पार पडले. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशासनाच्यावतीने सर्व व्यवस्था सर्व मतदान केंद्रांवर करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण 206 मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किल्लेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी पहिल्या 4 तासामध्ये एकूण 20.73टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील 77 हजार 355मतदारांनी आपला मतदानाचा हक्का बजावला आहे. आज मंगळवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. औरंगाबाद येथील मतदान केंद्रात मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क
औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किल्लेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात आज दुपारी 12 वाजता औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर श्री. चव्हाणे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील 206 मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. तसेच कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भाव पाहता सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. तसेच लोकशाही बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी यावेळी पदवीधर मतदारांना केले.