AurangabadCrimeUpdate : चौकीदार महिलेचे सर्विसबुक गहाळ, दोन कारकुनाविरुध्द गुन्हा

औरंगाबाद – नांदेड येथील जलसंधारण कार्यालयातील महिला चौकीदाराचे सर्विसबुक गहाळ करुन तिला सातव्या वेतन आयोगाचे फायदे मिळू दिले नाहीत या प्रकरणी औरंगाबादेतील सहाय्यक अभियंत्याच्या तक्रारीवरुन दोन कारकुनाविरुध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एस.एस.कोळी आणि के.एस. सुरडकर सध्या नेमणुक वैजापूर आणि गंगापूर हे दोन कारकून या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले.
नांदेडच्या जलसंधारण कार्यालयात व्ही. आर . बारहाते (३५)नावाची महिला चौकीदार या पदावर काम करते. शासनाचा सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर बारहाते यांनी मार्च २०१८ मधे त्यांचे मूळ सर्विस बुक औरंगाबादच्या विभागिय कार्यालयात अपडेट करण्यासाठी दाखल केले होते. त्याची पोचपावतीही घेतली होती. पण दोनवर्ष होत आले तरी सातव्या वेतन आयोगाचे फायदे मिळंत नसल्याचे बारहाते यांना कळल्यानंतर त्यांनी विभागिय कार्यालयात ज्या कारकुनांकडे सर्विसबुकची मूळ प्रत दिली होती त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी बारहाते यांच्या सर्विसबुक बाबत आपल्याला काहीच माहितानसल्याचे सांगितले.बारहाते यांनी जलसंधारणाच्या विभागिय अभियंत्याकडे याबाबत तक्रार दिली. विभागिय कार्यालयाने एक समिती नेमून आरोपी कोळी आणि सुरडकर यांची कसून चौकशी केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चौकशी समितीचे सदस्य अभियंता मोहम्मद तारैक नदीम यांच्या तक्रारीवरुन वरील आरोपींवर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात शासकिय दस्तऐवज प्रतिबंधक कायद्यानुसार ५वर्षे सश्रम कारावास तर शासकिय माहितीचा दुरुपयोग करंत मानसिक छळ करण्या प्रकरणी २वर्षे सश्रम कारावास आरोपींना मिळतो अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.