MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : राज्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत जाहीर

राज्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांसाठी दरमहा ५ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ज्या महिलांची मुलं शाळेत शिकत आहेत, अशा महिलांना अधिक अडीच हजार रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकार यासाठी तब्बल ५१ कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यातील ३० हजार महिला सेक्स वर्कर्सना ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यासाठी हि मदत दिली जाणार आहे.
राज्य सरकारने गुरुवारी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० हजार सेक्स वर्कर्सना कोविड 19 च्या संकटा दरम्यान मदत दिली जात होती. ३२ जिल्ह्यांशिवाय इतर जिल्ह्यांमधील सेक्स वर्कर्सची माहिती मिळवली जात आहे. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंघिक विभागाला आदेश दिले आहेत. ही मदत देताना कोणत्याही महिलेकडून ओळख पत्र दाखविण्याचा दबाव आणू नये. सरकारी आकड्यांनुसार पुण्यात ७०११, नागपूर ६६१६, मुंबईत २६८७ आणि मुंबई उपनगरात २३०५ सेक्स वर्कर्स आहेत.
दरम्यान यशोमती ठाकूर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश दिला आहे की, त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील संबंधित महिलांची यादी करून पाठवावी. याशिवाय हे देखील सांगावं की कशाप्रकारे अतिरिक्त मदत खाद्य पदार्थांच्या रुपात या सेक्स वर्कर्सना पोहोचविण्यात येऊ शकते. सरकारच्या आदेशानंतर जिल्हा स्तरावर तयार केल्या जाणाऱ्या समितीत महिला अधिकाऱ्यांशिवाय नाको (NACO) च्या स्थानिक प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे लोकही सामील होतील. या समितीत महिला आणि बाल कल्याण विभागातील अधिकारी सचिव म्हणून काम करतील.