IndiaNewsUpdate : ‘लव्ह जिहाद’ नंतर आता योगी सरकारचा सामूहिक धर्मांतराच्या विरोधात कायदा

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने ‘लव्ह जिहाद’ नंतर आता सामूहिक धर्मांतराच्या विरोधात कडक कायदा करण्याची तयारी केली आहे. धर्मांतराच्या प्रकरणातील आरोपींना दंड देण्याची तयारीही या मसुद्यात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात नवीन कायदा तयार करण्यासाठी वटहुकूम / अध्यादेश काढण्यात येणार आहे. याद्वारे सामूहिक धर्मांतरण करणाऱ्या आरोपींना १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून हा अजामीन पात्र गुन्हा ठरवण्यात येणार आहे.
‘उत्तर प्रदेश विधि विरुद्ध धर्मांतरण बंदी अध्यादेश २०२०’ असे या कायद्याचे नाव आहे . खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत कडक कायदा बनवण्याची घोषणा केली आहे. यानंतर गृह विभागाने लव्ह जिहाद अध्यादेशाचा मसुदा तयार करून तो न्याय विभागाकडे विचार-विनिमयासाठी पाठवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मसुद्याला परवानगी दिलीय. हे विधेयक लवकरच अधिवेशनात सादर केलं जाईल. धर्म परिवर्तन रोखण्याचा कायदा बनवण्यासाठी राज्य विधि आयोगाने उत्तर प्रदेश फ्रिडम ऑफ रिजनल बिल उपलब्ध केला आहे. याद्वारे कायदा बनवण्यासाठी अध्येदशाचा हिंदी आणि इंग्रजी भाषेत मसुदा तयार करण्यात आला आहे.