CoronaIndiaNewsUpdate : ताजी बातमी : कोरोनाच्या स्थतीचा येत्या दोन दिवसात अहवाल सादर करा , सर्वोच्च न्यायालयाचे “या” चार राज्यांना आदेश

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसात महाराष्ट्रासह चार राज्यांना सद्य परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान कोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. दरम्यान या चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Supreme Court pulls up Gujarat Govt for weddings &gatherings despite rising CIVID-19 cases. The Court says Gujarat is worst after Delhi and Maharashtra.
The Bench posts the matter for hearing next on Friday. https://t.co/1ZIL2UrbxU
— ANI (@ANI) November 23, 2020
“दिल्लीतील परिस्थिती नोव्हेंबरमध्ये अधिक बिकट झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल सरकारनं दाखल करावा,” असे निर्देश न्यायालयानं दिल्ली सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता संजय जैन यांना दिले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत,” असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
दरम्यान सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती तयारी केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि रुग्णांच्या हाताळणीसंदर्भात राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.