MumbaiNewsUpdate : हास्य अभिनेत्री भारती सिंग हिला एनसीबीकडून गांजा प्रकरणात अटक

NCB raided production office & house of comedian Bharti Singh & from both the places 86.5 gms of Ganja was recovered. Both Bharti & her husband Harsh Limbachiya accepted consumption of Ganja. Bharti Singh arrested & examination of Harsh Limbachiya is underway: NCB
— ANI (@ANI) November 21, 2020
एनसीबीने प्रसिद्ध हास्य अभिनेत्री भारती सिंहला गांजा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी या पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळी झालेल्या झाडाझडीत भारतीच्या घरात गांजा आढळला असून भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केलं आहे. त्यानंतर आता भारतीला अटक करण्यात आली आहे. खरे तर “बात कहांसे सुरू हुवी ठी और कहां कहां तक पहूंच रही है ! ” अशी या कारवाईची कथा झाली आहे.
ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर शनिवारी सकाळीच भारतीला ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. दरम्यान एनसीबीने भारतीच्या ऑफिस आणि घरावर छापा मारला असता या छाप्यामध्ये त्यांना ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. हा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर तिला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून ‘बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन ’ उघड होत आहे . त्यावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती. या यादीत आता प्रसिद्ध हास्य अभिनेत्री भारती सिंह हिचं देखील नाव समोर आलं आहे.
भारती सिंह ही एक प्रसिद्ध हास्य अभिनेत्री आहे. २००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या अनेक स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय ती ‘एफ. आय. आर.’, ‘बिग बॉस’, ‘अदालत’, ‘खिलाडी 786’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे.