MaharashtraCoronaUpdate : जाणून घ्या राज्याची कोरोची स्थिती

Maharashtra reports 5,760 new #COVID19 cases, 4,088 recoveries & 62 deaths. The total number of cases in the state is 17,74,455
There are 79,873 active cases in the state and 16,47,004 patients have recovered so far.
The death toll is at 46,573 pic.twitter.com/0Tr7Y78nv1
— ANI (@ANI) November 21, 2020
गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार ७६० रुग्ण नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ४ हजार ८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. राज्यात अनलॉक आणि दिवाळीनंतर कोरोनाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणारांची संख्या वाढत चालल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे त्यामुळे अधिक सावधानतेचा गरज आहे. विशेष म्हणजे १७ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २ ते ३ हजारांपर्यंत खाली आली होती.
दरम्यान महाराष्ट्रात ४ हजार ८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण १६ लाख ४७ हजार ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.८२ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ५ हजार ७६० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ इतकी झाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १ लाख २० हजार ४७० नमुन्यांपैकी १७ लाख ७४ हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २२ हजार ८१९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ५६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७९ हजार ८७३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज नोंद झालेल्या ६२ मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागी ४८ तासांमधले आहेत. तर १० मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
मुंबईत १०९२ नवे रुग्ण
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १०९२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १०५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत मुंबईत एकूण २ लाख ७४ हजार ५७२ रुग्णांना करोनाची बाधा झाली. यापैकी एकूण २ लाख ५१ हजार ५०९ रुग्णांनी करोनावर मात केली. मुंबईत करोनाची बाधा होऊन आत्तापर्यंत एकूण १० हजार ६५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत ९ हजार ३२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.