IndiaNewsUpdate : बोलेरो ट्रकवर आदळून भीषण अपघात , ६ मुलांसह १४ जण जागीच ठार , कटरने कापावी लागली गाडी !!

Pratapgarh: Fourteen persons including six children died after the vehicle they were travelling in collided with a truck on Prayagraj-Lucknow highway under limits of Manikpur police station last night. pic.twitter.com/2WOFMUyO8Z
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 20, 2020
उत्तर प्रदेशच्या प्रतापगड मध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ लहान मुलांसह १४ जण जागीच ठार झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे . भरधाव वेगात जाणाऱ्या बोलेरोच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो ट्रकवर आढळून हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो ट्रकच्या पूर्ण खाली गेली होती. या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघातात बळी पडलेले १४ जणांचे मृतदेह कटरने गाडी कापून बाहेर काढावे लागले . रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भयंकर अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपूर गावात विवाह सोहळ्याला सर्वजण उपस्थित होते. तिथून मिरवणूक संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला . चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी ट्रकवर आदळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि गॅस-कटरने बोलेरो कारला कापून मृतदेह बाहेर काढले आहेत.
प्रतापगडच्या माणिकपूर पोलिस ठाण्यातील देशराज इनारा येथे हा अपघात झाला. हे सर्व लोक लग्नाच्या वरातीहून परत येत होते. रात्री उशिरा भरधाव बोलेरो कारनं ट्रकला भीषण धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 5 मृतदेह बाहेर काढले असून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात खूप भीषण होता. बोलेरो कार ट्रकच्या खाली गेली होती आणि चुराडाही झाला होता. त्यामुळे ही कार क्रेनच्या मदतीनं बाहेर काढावी लागली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. चालकाला गाडी चालवताना डोळ्यावर झोप होती आणि अचानक गाडीवरच नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.