BiharPoliticalNewsUpdate : आश्चर्य आहे , बिहारच्या एनडीएप्रणित नितीश सरकारमध्येयावेळी एकही मुस्लिम चेहरा नाही !!

Advertisements
Advertisements
Spread the love

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली.  यानंतर परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झालं. मात्र, यंदा प्रथमच बिहार कॅबिनेटमध्ये एकही मुस्लीम चेहरा नसल्याचं समोर आलं आहे. एवढच नाहीतर बिहारमधील सत्ताधारी एनडीएकडे मुस्लीम समाजाचा एकही आमदार नाही.

Advertisements

विशेष म्हणजे बिहारच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे कि ,  बिहारमधील सत्तेत यावेळी एकही मुस्लिम आमदार आणि मंत्री नाही . टाईम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त, हिंदुस्थान अवाम मोर्चा(सेक्युलर) व विकास इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तरी, यापैकी कोणत्याही एका पक्षाला मुस्लीम आमदाराला निवडून विधानसभेत पाठवता आलेले नाही. विशेष म्हणजे या राज्यात १६ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूने ११ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. मात्र, ते सर्वजण निवडणूक हरले. जेव्हा बिहारच्या कॅबिनेटने शपथ घेतली. तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एखादा मुस्लीम चेहरा कॅबिनेटमध्ये घेण्याची संधी होती व नंतर त्याला विधानपरिषदेवर घेता आले असते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॅबिनेटची बांधणी करताना समजातील सर्व वर्गांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करूनही तसे काहीच घडले नाही. घटनात्मक तरतूदीनुसार बिहार कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३६ सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. म्हणजे नितीश कुमार यांना अद्यापही २१ सदस्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची संधी आहे. अशी शक्यता वर्तविली जात आहे की मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारामध्ये समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी मुस्लीम चेहऱ्याचा समावेश होताना दिसेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!