IndiaNewsUpdate : भाजप खासदारांच्या सहा वर्षीय नातीचा फटाक्याने भाजल्यामुळे मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

खा.  रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फटाके पेटवताना झालेल्या अपघातात ही चिमुरडी गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. चिमुरडीच्या मृत्यूच्या बातमीनं संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे . आज सकाळीच तिला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं होतं. रीता बहुगुणा जोशी या भाजपच्या प्रयागराजच्या खासदार आहेत. दिवाळीच्या दिवशी  त्यांचं संपूर्ण कुटुंब प्रयागराजमध्येच एकत्र आलं होतं.

Advertisements

रीता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची हि मुलगी होती. इतर मुलांसोबत तीदेखील घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेली होती. दिवाळीला फटाके पेटवताना चिमुरडीनं फॅन्सी ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली. सुरुवातीला इतर मुलांनी आरडा-ओरडा केला परंतु, लहान मुलं आपांपसात खेळत आहेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. घरातील लोक  मुलांकडे पोहचेपर्यंत मुलगी गंभीररित्या भाजली होती. उपचारांसाठी तिला  स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी चिमुरडीचं शरीर ६० टक्के भाजल्याचं सांगत तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. मंगळवारी सकाळीच मुलीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, उपचारा दरम्यान तिचा  मृत्यू झाला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!