बातमी बिहार राज्यातून…भाजपकडून सुशीलकुमार मोदींना पुन्हा संधी नाही , ” हे ” आहेत बिहारचे नवे उपमुख्यमंत्री…

विधायक दल के नेता के रूप में मुझे एक बड़ा दायित्व मिला है। इसका निर्वाहन हम बेहतर ढंग से करेंगे। मेरा जो संसदीय अनुभव रहा है उसका लाभ मिलेगा : तारकिशोर प्रसाद, भाजपा विधायक दल के नेता चुने जाने पर #Bihar pic.twitter.com/6SPfD7tMZI
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2020
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ भाजपने पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या गळ्यात घातली असली तरी त्यांच्या सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार यांना मात्र या सरकारमध्ये डच्चू दिला आहे . त्यांची जागा तारकिशोर प्रसाद यांची वर्णी लागत आहे. तारकिशोर प्रसाद हे कटिहार येथून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपने त्यांना विधानमंडळाचा नेता नियुक्त केले असून माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.
तारकिशोरजी को भाजपा विधानमंडल का नेता सर्वसम्मति से चुने जाने पर कोटिशः बधाई !
— Sushil Kumar Modi (मोदी का परिवार ) (@SushilModi) November 15, 2020
आज बिहारमध्ये एनडीएच्या बैठकीत नितीशकुमार यांची एकमताने बिहारमधील एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केल्यानंतर तारकीशोर प्रसाद यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. तर उपनेतेपदी रेणु देवी यांची निवड झाली. त्यामुळे सुशीलकुमार मोदींऐवजी आता तारकिशोर प्रसाद हे बिहारचे उपमुख्यमंत्री असतील, असे वृत्त आहे. याशिवाय पण रेणु देवी याही उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. भाजपने मात्र उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.
भाजपा एवं संघ परिवार ने मुझे ४० वर्षों के राजनीतिक जीवन में इतना दिया की शायद किसी दूसरे को नहीं मिला होगा।आगे भी जो ज़िम्मेवारी मिलेगी उसका निर्वहन करूँगा।कार्यकर्ता का पद तो कोई छीन नहीं सकता।
— Sushil Kumar Modi (मोदी का परिवार ) (@SushilModi) November 15, 2020
दरम्यान तारकिशोर प्रसाद यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होताच सुशीलकुमार मोदींनी ट्विट करून ताराकिशोर यांचे अभिनंदन करून म्हटले आहे कि , भाजप आणि संघ परिवाराने ४० वर्षांच्या राजकीय जीवनात आपल्याला इतकं दिलंय की दुसर्या कुणालाही भेटलं नसेल. या पुढील जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडेन. कार्यकर्त्याचे पद मात्र कोणीही काढून घेऊ शकत नाही. त्याचबरोबर भाजप नेते गिरीराज सिंह यांनीही तारकिशोर प्रसाद यांचं अभिनंदन करून म्हटले आहे कि , तारकीशोरजी आपली आज विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. तुम्ही सर्वांनासोबत घेऊन पुढे जाल. हा विश्वास आहे.