BiharPoliticalUpdate : अखेर नितीशकुमार बोलले , एनडीएला दिलेल्या बहुमताबद्दल जनतेला केले नमन आणि मोदींचे मानले आभार

मोठ्या भावाचे रूपांतर लहान भावात झालेले जेडीयूचे नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शेवटी एनडीएच्या विजयात आपला विजय मानून मतमोजणीला २४ तास उलटून गेल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जेडीयूच्या जागा कमी झाल्याने एकीकडे नितीश कुमार यांना भाजपा मुख्यमंत्रीपद देणार की नाही यावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते तर दुसरीकडे नितीश कुमार यांनी मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळातही अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान भाजपाने बुधवारी दिल्लीत विजयाचं जंगी सेलिब्रेशन आयोजित करताच नितीश कुमार यांनी ट्विट करून आपलं मौन सोडलं आहे.
जनता मालिक है। उन्होंने NDA को जो बहुमत प्रदान किया, उसके लिए जनता-जनार्दन को नमन है। मैं पीएम श्री @narendramodi जी को उनसे मिल रहे सहयोग के लिए धन्यवाद करता हूँ।
— Nitish Kumar (@NitishKumar) November 11, 2020
आपल्या ट्विटमध्ये नितीश कुमार यांनी पहिले नमन जनतेला केले आहे कारण त्यांनी म्हटले आहे कि , जनता मलिक है !! ज्यांनी एनडीएला जे बहुमत दिले . त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्याकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
दरम्यान बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात भव्य सेलिब्रेशन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी नितीश कुमार यांनी ट्विट करत आपलं मौन सोडलं.