MaharashtraNewsUpdate : धक्कादायक : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी आणि यशवंतराव गडाख यांच्या सुनेचे आकस्मिक निधन

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सुनबाई गौरी प्रशांत गडाख (वय ३८) यांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तपासून डॉक्टारांनी मृत घोषित केले . रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. दरम्यान पोलिसांना याबाबत कळविण्यात आले आहे . या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियमानुसार याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन पुढील तपास सुरू केला आहे. गौरी या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत यांच्या पत्नी होत. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.