Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AmericaPresidentElectionUpdate : याला म्हणतात ” मीडिया ” !! फेका -फेकी लक्षात येताच अमेरिकन माध्यमांनी ट्रम्पच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण थांबवले !!

Donald Trump gives a policy speech during a campaign stop in Monessen, Pa., on Tuesday.

Spread the love

अलीकडच्या काळात आपली मध्ये सरकार धार्जिणे बनत असल्यामुळे टीकेचा विषय झाली आहेत . या पार्श्वभूमीवर अमेरिकन प्रसार माध्यमांनी मात्र आपण बातम्यांच्या प्रति प्रामाणिक आहोत हे दाखवत जगाला एक आदर्श घालून दिला आहे . त्याचे झाले असे कि , अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू आहे. पराभवाच्या छायेत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आरोप आणि खोटे दावे केले जात आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खोटे दावे करणारे भाषण सुरू केले. मात्र, ट्रम्प आपल्या भाषणात फेका -फेकी करून खोटी माहिती देत असल्याचे लक्षात येताच अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या  लाईव्ह भाषणाचे प्रक्षेपण बंद करून टाकले. या  माध्यमांच्या म्हणण्यानुसार याआधीही  डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदानाच्या रात्री केलेल्या भाषणात अनेक चिथावणीखोर वक्तव्ये केली होती.


याउलट आपल्याकडे  मुळात बहुतेक नेत्यांची भाषणे , मुलाखती पूर्णतः पेड असल्यामुळे अशी हिम्मत माध्यमे  दाखवू शकत नाहीत . अतिकडे मेरिकेत मात्र  एबीसी आणि एनबीसीसह इतर काही वाहिन्यांनी ट्रम्प यांचे लाइव्ह भाषण थांबवले. लोकांनी निवडणुकीवर ताबा मिळवला असल्याचा खोटा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. अमेरिकेसाठी ही दु:खद रात्र असल्याचे सीएनएनच्या जॅक टॉपर यांनी म्हटले. अमेरिकन टीव्ही नेटवर्क म्हटले की. कोणत्याही पुराव्याच्या आधारे, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मते चोरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी आम्ही निवडणूक जिंकत असल्याचा दावा याआधी अनेकदा केला आहे. आमच्याकडे पुरावे असून कोर्टात पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी सुरू झाल्यानंतरच्या काही तासांमध्ये ट्रम्प यांनी डेमोक्रॅटीक पक्षावर अनेक आरोप करत आपल्या विजयाचा दावा केला. मतमोजणीत ट्रम्प पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी आणखी आरोप करत आपला विजय जाहीर केला. त्यावरूनही ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली.

या माध्यमांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांच्याकडून मतमोजणी आणि निकालाबाबत खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करण्यात येत असताना फेसबुक आणि ट्विटर यांच्याकडूनही त्याची दखल घेण्यात आली. ट्रम्प यांच्या निवडणूक मतमोजणीच्या दाव्याला घेऊन फेसबुक आणि ट्विटरने युजर्ससाठी फ्लॅग झळकावला. मागील तीन दिवसांत ट्रम्प यांच्या अनेक ट्विटची दखल ट्विटरकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प समर्थक आणि विरोधकांची अमेरिकेत निदर्शने सुरू झाली आहेत. हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर, विविध शहरातून ५०हून अधिकजणांना पोलिसांनी अटक केली आहे. ट्रम्प समर्थकांसह विरोधकही रस्त्यांवर उतरले असून त्यांनी प्रत्येक मत मोजण्याची मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!