BiharElectionUpdate : ईव्हीएम नव्हे एमव्हीएम !! मोदी वोटिंग मशीन , राहुल गांधी यांचे टीकास्त्र

EVM is not EVM, but MVM – Modi Voting Machine. But, this time in Bihar, the youth is angry. So be it EVM or MVM, 'Gathbandhan' will win: Congress leader Rahul Gandhi in Bihar’s Araria#BiharElections2020 pic.twitter.com/PBSQwfPY0l
— ANI (@ANI) November 4, 2020
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अररियामध्ये बुधवारी घेतलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारमधील नितीश सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले कि , ईव्हीएम म्हणजे एमव्हीएम – मोदी वोटिंग मशीन पण, यावेळी बिहारमध्ये तरुणांमध्ये रोष आहे. अशा परिस्थितीत, ईव्हीएम असो वा एमव्हीएम, यावेळी ‘महाआघाडीच’ जिंकणार आहे हे नक्की. आपलं हे नातं एका दिवसाचं नव्हे तर जीवनभरासाठी असायला पाहिजे. पंतप्रधान मोदी जितका द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात तितकंच मी प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करतो. द्वेष हा द्वेषाने नव्हे तर प्रेमानेच संपवता येतो.
राहुल गांधी पुढे म्हणाले कि , काळ्या पैशाविरूद्ध मोदींचा लढा होता तर मग ते शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार यांच्याविरुद्ध का उभे राहिले? त्यांच्याकडे काळा पैसा होता का? देशातील लाखो मजूर रोजंदारीवर जगतात, हे पंतप्रधान मोदींना ठाऊक आहे. पण लॉकडाउन घोषित करण्यापूर्वी बिहार आणि इतर राज्यातील मजुरांचे काय होईल? याचा विचार पंतप्रधान मोदींनी एक मिनिटही केला नाही.
महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तर ते प्रत्येक जाती, धर्म, गरीब, मजूर आणि प्रत्येक जिल्ह्याचे सरकार असेल. आम्ही एकत्रितपणे हे राज्य बदलण्याचे कार्य करू. छत्तीसगडमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. सत्तेत आल्यावर धान खरेदीला २५०० रुपये दिले जातील, असं आश्वासन त्या निवडणुकीत आम्ही दिलं. हे सत्तेत आल्यावर आम्ही हे आश्वासन पूर्ण केलं, असं राहुल गांधी म्हणाले. पंजाबमध्ये फूड प्रोसेसिंगचे कारखाने आहेत. म्हणून तेथे योग्य दर आहे. म्हणून मक्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला बिहारमध्ये कारखाने उभारावे लागतील. हे सर्व कारखाने आपल्या शेताजवळ असतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.