MaharashtraNewsUpdate : लॉकडाऊन काळातील वाढत्या वीज बिलाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे

राज्यात लॉकडाऊन काळात वीजबिलाच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार ग्राहकांना वीज बिलात सूट मिळणार असून राज्य सरकारचा त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे लोकांना वीजबिलात दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती सांगत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
कोरोना काळात राज्यातील जनतेला भरमसाठ वीजबिले गळ्यात मारणाऱ्या ऊर्जा मंत्रालयाने आजतागायत लोकांना यातून दिलासा दिलेला नाही. वीजबिलात सर्वसामान्य लोकांना सवलत देण्याचा प्रस्ताव ऊर्जा खात्याने बनविला असून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे लोकांना वीजबिलात दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले होते. या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिले पाठविण्यात येत होती. लॉकडाउन उठविण्यात आल्यानंतर जूनमध्ये रिडिंग घेण्याचे काम सुरू झाले आणि नव्या रिडिंगनुसार एकत्रित बिले पाठविण्यात आली. मात्र, त्यातील भरमसाट रकमा पाहून हजारो ग्राहकांना मोठा शॉक बसला आहे. विविध पक्ष संघटनांनी याविरोधात आंदोलनेही केली आहेत. त्याची दखल घेत हा निर्णय घेतला असल्याचे ऊर्जामंत्री म्हणाले.