IndiaNewsUpdate : हाथरस प्रकरणावर बोलणारे राहुल गांधी होशियारपूर प्रकरणावर का बोलत नाहीत ? : निर्मला सीतारामन

उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणावर बोलणारे काँग्रेस नेते राहुल गांधी , पंजाबमधील होशियारपूर या ठिकाणी सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न झाला. या घटनेबाबत शांत का बसले आहेत असा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विचारला आहे. जेव्हा हाथरसमध्ये बलात्कार आणि हत्याकांड झालं त्यावेळी राहुल गांधी राजकारण करण्यासाठी तिथे गेले होते. मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये जेव्हा एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी शांत बसले का बसले आहेत? असा प्रश्न निर्मला सीतारामन यांनी विचारला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मला काँग्रेस पक्षाला विचारायचं आहे की जिथे तुमचं सरकार नाही तिथे बलात्कार झाला तर तुम्ही बहीण-भाऊ कारने त्या ठिकाणी जाऊन पिकनिकसारखं प्रदर्शन करता. पंजाबच्या होशियारपूरमध्ये बलात्कारची घटना घडली, एका मुलीची हत्याही झाली. तरीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शांत का आहेत? प्रत्येक घटनेवर ट्विट करणारे राहुल गांधी होशियारपूरबाबत शांत का बसले आहेत? पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे म्हणून ते गप्प बसलेत का?”
दरम्यान या प्रकरणात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी एवढ्या कळकळीने हाथरसला गेले होते. आता होशियारपूरमध्ये घडलेल्या घटनेबाबत राहुल गांधी गप्प का बसले आहेत? ही घटना घडून तीन दिवस झालेत तरीही राहुल गांधी तिथे का गेलेले नाहीत? असं प्रकाश जावडेकर यांनी विचारलं आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेहही जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Not a word from the tweet-friendly leader Shri Rahul Gandhi. No tweets on this (Hoshiarpur rape incident), no outrage on this, & no picnic on this. A woman heads the party. Does this kind of selective outrage suits the stature of their party: Nirmala Sitharaman, BJP pic.twitter.com/0YKStYGsKy
— ANI (@ANI) October 24, 2020