IndiaNewsUpdate : आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर राहुल गांधी यांची टीका

Deep inside, Mr Bhagwat knows the truth. He is just scared to face it.
The truth is China has taken our land and GOI & RSS have allowed it. pic.twitter.com/20GRNDfEvD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2020
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी चीनबाबत केलेल्या विधानावर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोहन भागवत यांना सर्व सत्य माहीत आहे. मात्र याचा सामना करायला ते घाबरतात. सत्य हे आहे की, चीनने आपली जमिन हस्तगत केली आहे. आज विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएस कार्यकर्तांना संबोधित करताना चीनबाबत विधान केलं. सरसंघचालक म्हणाले की, संपूर्ण जगाने पाहिलं की कशा प्रकारे चीन भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करीत आहे. चीनचा विस्तारवादी व्यवहार सर्वांना माहीत आहे. चीनचा तायवान, व्हिएतनाम, यूएस, जपान आणि भारत या देशांसोबत तणाव आहे. मात्र भारताच्या कारवाईमुळे चीन घाबरला आहे.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , खरं तर भागवतांना सत्य माहीत आहे. मात्र ते याचा सामना करायला घाबरतात. सत्य हे आहे की चीनने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे. आणि भारत सरकार आणि आरएसएसने याची परवानगी दिली आहे. यापूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे सैन्याच्या पराक्रमावर म्हणाले की, सैन्याची अतुट देशभक्ती आणि अदम्य धैर्य आमच्या शासनकर्त्यांचा स्वाभिमान, भारतीयांची दुर्दम्य नीती-धैर्याचा परिचय चीनला पहिल्यांदा झाला आहे. यंदा भारताने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली, त्यामुळे चीन घाबरला आहे. चीनला जबरदस्त धक्का मिळाला आहे, कारण भारत धैर्याने उभा आहे. मात्र यानंतर आपण दुर्लक्ष करू चालणार नाही. अशा संकटांकडे लक्ष ठेवायला हवं.