MumbaiNewsUpdate : १२ तास उलटून गेले तरी सिटी सेंटर मॉल ची आग काही आटोक्यात येईना , शेजारच्या साडेतीन हजार नागरिकांचा मैदानावर ठिय्या….

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीबाबत
मुंबई सेंट्रल येथे मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल (दिनांक २२ ऑक्टोबर २०२०) रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली. pic.twitter.com/0rGymsXCCx
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 23, 2020
काल रात्रीपासून मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या १२ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पहाटे दोनच्या सुमारास अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल स्तराची घोषणा करण्यात आली.
दरम्यान सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव्ह या ५५ मजली इमारतीमधील जवळपास ३५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे २५० जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन जवान जखमी झाले आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.