BiharElectionUpdate : पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदी यांनी डागली विरोधकांवर तोफ

NDA govt abrogated Article 370. These people say they will bring it back if they come to power. After saying this they dare to ask for votes from Bihar. Is this not an insult of Bihar? The state which sends its sons and daughters to the borders to protect the country: PM Modi pic.twitter.com/AcsGcKJg5i
— ANI (@ANI) October 23, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ केल्या . सासाराम येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादवांसह विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला.
आपल्या पहिल्या सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले कि , बिहारच्या पुत्रांनी तिरंग्यासाठी आणि भारत मातेची मान उंच ठेवण्यासाठी गलवान व्हॅलीत बलिदान दिलं. पुलवामा हल्ल्यातही बिहारचे जवान शहीद झाले. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. पुलवामा हल्ल्यातही बिहारचे जवान शहीद झाले. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. एनडीए सरकारनं कलम ३७० रद्द केलं. पण, हे लोक (विरोधक) म्हणत आहेत की, ते सत्तेवर आल्यानंतर कलम ३७० पुन्हा परत आणणार. असं बोलल्यानंतरही ते बिहारमध्ये मत मागण्याचं धाडस करत आहेत. जे राज्य आपल्या मुलामुलींना देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवणाऱ्या बिहारचा हा अपमान नाही का?,” अशी टीकाही मोदी यांनी केली होती. बिहारच्या भविष्यासाठी आम्ही नितीश कुमार यांच्यासोबत आलो आहे. केंद्र सरकारने अनेक योजना बिहारला दिला आहेत तर काही प्रस्तावित आहेत. म्हणून बिहारच्या विकासासाठी एनडीएला मतदान करा.