IndiaNewsUpdate : देशातील ३० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची खुश खबर

विजयदशमी या दुर्गा पूजा के पहले ही केंद्र सरकार के 30 लाख नॉन गैजेटेड कर्मचारियों को 3737 करोड़ के बोनस का भुगतान किया जाएगा, इससे बाजार में मांग बढ़ेगी और फेस्टिवल सीजन में मध्यम वर्ग के हाथ में पैसा होगा : केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar #CabinetDecisions pic.twitter.com/ONh2XutYki
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) October 21, 2020
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार कॅबिनेट बैठकीत मोदी सरकारने ३० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. ३,७३७ कोटी रुपयांचा हा बोनस दसऱ्यापूर्वीच देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की, व्यावसायिक सेवांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या हिशोबाने २,७९१ कोटी रुपयांचा बोनस मिळेल. आता या कमर्शिअल एस्टॅब्लिशमेंटमध्ये येणारे कर्मचारी म्हणजे भारतीय रेल्वे , पोस्ट ऑफिस, डिफेन्स प्रोडक्शन्स, ईपीएफओ , एम्प्लॉइ स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशन अशा सेवांमधल्या १७ लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार असून अर्थात त्यांनी केलेल्या कामाच्या हिशोबाने तो दिला जाणार आहे. याशिवाय केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या १३ लाख कर्मचाऱ्यांना ९०६ कोटी रुपये नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्डबोनस दिला जाईल.
यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं की, केंद्र सरकारने घोषित केलेला दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यांमध्ये डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (DBT)द्वारे जमा होईल. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात त्यांच्याकडे रोख रकमेची चणचण जाणवणार नाही. मध्यमवर्गाला डोळ्यापुढे ठेवून सणाअगोदरच ही रक्कम बँक खात्यात वळती केली जाणार आहे. मोदी सरकारने घोषित केलेल्या दिवाळी बोनसमुळे सरकारी तिजोरीवर ३,७३७ कोटींचं अतिरिक्त ओझं पडणार आहे. ३० लाखांहून अधिक नॉन गॅझेटेड सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.