IndiaNewsUpdate : वर्क फ्रॉम होमच्या तणावातून तरुण अभियंत्याची आत्महत्या

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमच्या तणावातून एका ३२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या या व्यक्तीने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरुन काम करताना येणारा दबाव सहन न झाल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. गुजरातमध्ये ही घटना घडली आहे. जिगर गांधी असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. जिगरचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा होणार होता. नोएडा येथील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून तो काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता आणि घरुनच काम करत होता. जिगर गेल्या काही दिवसांपासून घरून काम करावं लागत असल्याने किती तणाव असता याबद्दल सांगत होता अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली आहे. शवविच्छेदन अहलावात गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.