MaharashtraNewsUpdate : नंदुरबार जिल्ह्यात खासगी बसला भीषण अपघात , ५ ठार ३५ जखमी

Five persons dead and around 35 injured after the bus they were travelling in fell into a gorge near Khamchoundar village in Nandurbar. The injured have been taken to a hospital. Rescue operation underway: Mahendra Pandit, SP Nandurbar. #Maharashtra pic.twitter.com/I0QYnrMisd
— ANI (@ANI) October 21, 2020
नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात खासगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. घाटातील दर्ग्याजवळ असणाऱ्या पुलावर रात्री तीन वाजेच्या सुमारास दरीत बस कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला होता. हे सर्व प्रवासी ‘अंकल ट्रॅव्हल्स’च्या खासगी बसने जळगावहुन सुरतच्या दिशेने प्रवास करत होते. जवळपास ४० पेक्षा अधिक प्रवासी या बसमध्ये होते.
दरम्यान घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य राबवत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालायत दाखल केले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिवाय, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे. सुरूवातीला बसमध्ये अडकलेल्या जिवंत व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. या अपघातील गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने विसरवाडीहुन खासगी गाड्यांनी या जखमींना पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.