IndiaNewsUpdate : दिवाणी न्यायालयाने फेटाळलेली श्रीकृष्ण जन्मभूमी जागेच्या वादावरील याचिका जिल्हा न्यायालयात

उत्तर प्रदेशच्या मथुरा दिवाणी न्यायालयाने फेटाळलेली मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादावरील श्रीकृष्ण विराजमान यांची याचिका जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केली आहे. १२ अक्टोबरला श्रीकृष्ण विराजमान यांच्याकडून जिल्हा न्यायालयात सदर प्रकरण दाखल करण्यात आले होती. या याचिकेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरात अतिक्रमण करुन शाही ईदहाग मशीद बनवण्याचा आरोप लावण्यात आला असून शाही मशिदीच्या जमिनीसह १३.३७ एकर परिसरावर दावा करत मालकी हक्क मागण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात शुक्रवारी जिल्हा कोर्टाने सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डासह ४ पक्षांना नोटीस पाठवली असून पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. श्रीकृष्णा विराजमान यांचे वकील हरीशंकर जैन यांनी सांगितले की वक्फ बोर्डाशिवाय शाही मस्जिद ईदगाह ट्रस्ट, श्री कृष्णा जन्मभूमी ट्रस्ट, श्री कृष्णा जन्मस्थान सेवा संस्थान यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
याचिकेत काय म्हटले आहे ?
दरम्यान याचिकाकर्ते रंजना अग्निहोत्री यांनी सांगितले की, २५ सप्टेंबर रोजी सदर याचिका दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात दाखल करण्यात आली होती परंतु ३० सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायाधीशांनी जर आमचे प्रकरण भक्त म्हणून मंजूर झाले तर न्यायालयीन व्यवस्था कोलमडेल असे सांगून याचिका फेटाळून लावली होती . या आदेशानंतर आम्ही जिल्हा न्यायालयात अपील केले असून आम्ही जे ग्राउंड दिले होते, त्याच्या आधारावर जिल्ह्यात कोर्टाने आमचे अपील मंजूर केले आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या जागेवर शाही ईदगाह मशीद उभी आहे, त्या ठिकाणी कारागृह होते, जेथे श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. ही याचिका श्रीकृष्णा विराजमान, स्थान श्रीकृष्ण जन्मभूमी कटरा केशवा देव केवट, रंजना अग्निहोत्री, प्रवेश कुमार, राजेश मणि त्रिपाठी, करुणेश कुमार शुक्ला, शिवाजी सिंह, त्रिपुरारी तिवारी यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.
मूळ वाद काय आहे ?
या विषयी अधिक माहिती अशी कि , १९५१ मध्ये श्री कृष्णा जन्मभूमी ट्रस्टची बनवून ठरवण्यात आले की, तेथे पुन्हा भव्य मंदिराची निर्मिती होईल आणि ट्रस्ट त्याचे प्रबंधन करेल. यानंतर१९५८ मध्ये श्री कृष्ण जन्म स्थान सेवा संघ नावाची संस्था स्थापन झाली. कायदेशीररित्या या संस्थेला जमिनीवर मालकी हक्क नव्हता. मात्र याने ट्रस्टसाठी ठरवलेली सर्व भूमिका निभावणे सुरू केल्या. या संस्थेने १९६४ मध्ये संपूर्ण जमिनीवर नियंत्रणासाठी एक सिव्हील केस दाखल केली, मात्र १९६८ मध्ये स्वतःच मुस्लिम पक्षासोबत समझोता केला. यानुसार मुस्लिम पक्षाने मंदिरासाठी आपल्या ताब्यातील काही भाग सोडला त्यामोबदल्यात त्यांना (मुस्लिम पक्षाला) त्याच्याजवळची जागा दिली. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद १३.३७ एकरात बनली आहे. यामध्ये १०.५० एकर भूमीवर वर्तमानमध्ये श्रीकृष्ण विराजमान यांचा ताबा आहे. मात्र याचिकाकर्त्यांनी संपूर्ण जमिनीचा मालकी हक्क मागितला आहे.