AurangabadNewsUpdate : कोर्टाच्या आदेशाने गोवंशीय प्राणी नेणार्या नागरिकाला तिघांची मारहाण

औरंगाबाद – गंगापूर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल १६गोवंशीय जनावरे गंगापूर न्यायालयाच्या आदेशाने परत मिळाल्या नंतर घेऊन जात असतांना अमरप्रित चौकात १४आॅक्टोबर रोजी रात्री १०वा.तिघांनी टेंपो समोर मोटरसायकल आडवी लावून टेंपोचालकाला जनावरे वाहून नेत असल्याबद्दल मारहाण केली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ बोंबले (४५) सिध्दीवाल,आणि नलावडे यांनी बुधवारी रात्री १०वा. राजेंद्र मनिराम राजपूत रा.गंगापूर यांना टेंपोमधे जनावरे का वाहून नेतो असे म्हणंत हाताचापटाने मारहाण केली.राजपूत हे कोर्टाच्या आदेशाचे पालन करंत असल्यामुळे त्यांनी कोर्टाची आॅर्डर आरोपींना दाखवली पण ती आरोपींना लक्षात आली नाही.तरीही मारहाण केल्यामुळे राजपूत यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गायकवाड करंत आहेत