Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaCrimeUpdate : ट्रॅक्टर चालकाचा सतरा वर्षीय मुलीवर बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड जिल्ह्यात ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या  एका २५ वर्षांच्या युवकाने सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यातील सारूक वाडी येथे घडली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. शेतातून घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गावातील एका नराधमाने जबरदस्तीने हाताला धरून तिला कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून जबरी बलात्कार केला आणि जर कोणाला सांगितले तर जे मारण्याची धमकी दिल्याचे पिडीत मुलीच्या आईने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

Advertisements

या विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि ,  केज तालुक्यातील सारुकवाडी येथे एक १७ वर्षीय मुलगी ही दुपारी शेतातून परत येत असताना नंदकिशोर गीते याने हात धरून कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून शेतात तिच्यावर जबरी बलात्कार केला. पीडित मुलीने आरडाओरड केली परंतु जवळ कोणी नसल्यामुळे तिची सुटका झाली नाही. नंदकिशोर गीते याने पीडित मुलीस हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. परंतु भीतीपोटी आईने तो प्रकार पीडित मुलीच्या वडीलास सांगितला नाही.

Advertisements
Advertisements

या पूर्वी देखील नंदकिशोर कैलास गीते हा पीडित मुलीला इशारे करून तिची छेडछाड काढत होता. परंतु भीतीपोटी पीडित आणि बदनामीच्या होईल म्हणून मुलीने हा प्रकार घरी सांगितला नव्हता. त्यानंतर आज पीडित मुलीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्या नंतर केज पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या फिर्यादिवरून गिते यांच्या विरोधात बलात्काराचा आणि बाललैंगिक अन्याय अत्याचार कायदा नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपी नराधम नंदकीशोर कैलास गीते यास ताब्यात घेतले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!