AurnagabadCrimeUpdate : बदनापुर महिला पोलिस कर्मचार्याला पाहुन जामिनावर सुटलेले चोरटे पळाले

औरंगाबाद- जामिनावर सुटलेले मोटरसायकलचोरांची चौकशी करण्यासाठी बदनापूर महिला पोलिस कर्मचारी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात आल्यानंतर चौकशीसाठी बोलवलेल्या चोरट्यांनी महिलापोलिसाला पाहताच धूम ठोकली. यावर बदनापूर पोलिस निरीक्षक मारुती खेडकर खोट.बोलंत म्हणाले मला माहित नाही.पण असं काही झालं असेल काय होत ? पुन्हा चोरटे धरु असं म्हणून मोकळे झाले.
सखाराम विष्णू जगताप(३०)प्रताप विष्णू कोरडे(३०) दोघेही रा.माउलीनगर रांजणगाव अशी रेकाॅर्डवरील मोटरसायकल चोरांची नावे आहेत. यांच्यावर एक आठवड्यापूर्वी वाळूज औद्योगिक पोलिसांनी कारवाई करंत सहा मोटरसायकल जप्त केल्या होत्या.त्या प्रकरणात चोरट्यांची न्यायालयाने आज जामिनावर मुक्तता केली होती. दरम्यान बदनापूर पोलिसांनाही जामिनावर मुक्त झालेल्या वरील चोरट्यांची चौकशी करायची होती.म्हणून बदनापुर पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी वाळूज औद्योगिक पोलिसांना कळवले होते. व खरात नावाच्या महिला पोलिसला चौकशीसाठी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात पाठवले. खरात यांच्या सांगण्यावरुन जामिन मिळालेल्या दोन्ही चोरट्यांना एम.वाळूज पोलिसांनी पुन्हा बोलावले म्हणून ते पोलिस ठाण्यात आले. खरात यांनी चोरट्यांना पाहिल्यावर पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांना फोन लावला.व सांगितले की,हे रेकाॅर्डवरील मोटरसायकलचोर आपण ताब्यात घेतल्यास बरीच माहिती उजेडात येऊ शकेल.हा संवाद चोरट्यांनी ऐकला व एक जणाने पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला.तो पर्यंत खरात यांचे खेडकरांशी बोलणे झाले होते. म्हणून त्यांनी तिथे उभा असलेल्या एका चोरट्याला विचारले तुझा साथीदार कुठे ? तो म्हणाला मी आता घेऊन येतो असे म्हणून दुसरा चोरटाही सटकला.