IndiaCrimeNewsUpdate : धक्कादायक : बलात्कारानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर केले वार … !!

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेश आणि  राजस्थान पाठोपाठ मध्य प्रदेशातील रेवा येथेही  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षीय तरुणाने एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टवर वार केले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. पीडित मुलगी गुरुवारी एका पार्टीहून घरी परतत होती. त्याचवेळी दोघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर त्यातील एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून  तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisements

या प्रकरणातील मुख्य आरोपी अंकित रावत याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार वंशपती रावत (वय २७) हा फरार झाला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांनी दिली. पीडिता पार्टीनंतर घरी परतत होती. त्याचवेळी अंकित आणि वंशपती या दोघांनी तिचे अपहरण केले. अंकितने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टवर वार केले. तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, असेही त्यांनी सांगितले. दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!