HathrasGangRapeCase : तुमची स्वतःची किंवा श्रीमंतांची मुलगी असती तर तिला असेच मध्यरात्री जाळले असते काय ? हाय कोर्टाची अधिकाऱ्यांना विचारणा

Family members of Hathras alleged gang-rape victim reach their residence.
They were in Lucknow today to appear before the Lucknow bench of Allahabad High Court. pic.twitter.com/BvTW0n4FOc
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 12, 2020
उत्तर प्रदेशच्या हाथरसजिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाली . या सुनावणी दरम्यान नायालयाने घटनेचा घटनाक्रम जाणून घेताना पीडित मुलीच्या परिवाराला न विचारात तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कारण काय ? अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले कि , कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून असे करावे लागले त्यावर न्यायालयाने फटकारे लागवताना म्हटले कि , पीडित तुमची मुलगी असती किना एखाद्या श्रीमंत व्यक्तीची मुलगी असती तर तुम्ही तिला अशाच पद्धतीने जाळून टाकले असते काय ? त्यावर सरकार पक्षाचे वकील शांत राहिले . पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने सुनावणीसाठी २ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली. न्या. पंकज मित्तल व न्या. राजन रॉय यांनी सोमवारी या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तसेच हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही न्यायालयापुढे साक्ष नोंदवली.
The victim's family has demanded that reports of CBI be kept cofidential. We had also prayed that the case be transferred out of UP. The third demand is that the family be provided security until the case completely concludes: Seema Kushwaha, lawyer of #Hathras victim's family https://t.co/zh7SB1q16E pic.twitter.com/uDpUtJEiMR
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 12, 2020
पहाटे कडेकोट पोलीस बंदोबस्तात पीडितेच्या कुटुंबियांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि सुनावणीनंतर रात्री या कुटुंबियांना त्यांच्या घरी परत आणण्यात आले. हाथरस जिल्ह्यात चार उच्चवर्णीय तरुणांनी १४ सप्टेंबरला एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. गंभीर जखमी झालेली ही तरुणी १५ दिवसांनी दिल्लीच्या एका रुग्णालयात मरण पावली. त्यानंतर तिच्या पार्थिवावर रात्रीच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने स्वतः याचिका दाखल करून घेतली असून त्यावरील सुनावणी चालू झाली आहे.
#Hathras alleged gangrape case: Hearing is underway at the Lucknow Bench of Allahabad High Court. Family of the victim, Additional Chief Secretary (Home Dept) Awanish K Awasthi, DGP HC Awasthy and other officers – including local administration, DM and SP – are also present.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 12, 2020
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्य न्यायालयासमोर सोमवारी हजर राहिले आणि त्यांनी आपली विनंती न्यायालयासमोर ठेवली . यामध्ये सीबीआयचा तपास गोपनीय पद्धतीने करण्यात यावा , या प्रकरणाचा खटला उत्तर प्रदेशाच्या बाहेर चालविण्यात यावा , आणि खटल्याचे कामकाज पूर्ण होईपर्यंत कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे . पीडित पक्षाच्या वकील सीमा कुशवाह यांनी न्यायालयासमोर त्यांची बाजू मांडली . दरम्यान पीडित तरुणीच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी घेण्यात आला आणि याबाबत राज्य सरकार किंवा प्रशासनाकडून कुठलाही दबाव नव्हता, असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी २ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली असल्याचे राज्य सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता व्ही.के. शाही यांनी सांगितले. यापूर्वी मुलीचे आईवडील आणि तीन भाऊ यांना हाथरस येथून कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाचा सद्य:स्थिती अहवाल सादर करण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना पाचारण केले होते.
The Court will give a decision. The next date of hearing is 2nd November, 2020: Aditional Advocate General VK Shahi, representing Uttar Pradesh government before Lucknow Bench of Allahabad High Court, in #Hathras case https://t.co/zh7SB1q16E pic.twitter.com/gRku23HlUa
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 12, 2020