Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarpradeshCrimeUpdate : तरुणीसोबत अश्लील चाळे करून बळजबरी , भाजपच्या बूथ अध्यक्षाला केले गजाआड

Spread the love

उत्तर प्रदेशातील हाथरसचे प्रकरण गाजत असतानाही गुन्हेगारीतील महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत.  बदायूंच्या सहसवान येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून एकट्या असलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करून तिचे कपडे फाडले आणि तिला मारहाण केली. या प्रकरणी भाजपच्या बूथ अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार बदायूंच्या सहसवानमध्ये भरदिवसा ही घटना घडली. तरुणीला एकटी पाहून संशयित आरोपी विपीन माली हा घरात घुसला. तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. विरोध केल्यानंतर त्याने तरुणीला मारहाण केली. याचदरम्यान तिच्या अंगावरील कपडेही फाडले. पीडितेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि ती टेरेसवर जाऊन आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. पळून जाताना त्याने तिला धमकीही दिली. कुटुंबीय परतल्यानंतर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी माली याला जेरबंद करून  त्याची तुरुंगात रवानगी केली.

या प्रकरणी पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी साधारण एक वाजण्याच्या  सुमारास तरुणीचे कुटुंबीय बाहेर गेले होते तेंव्हा  तरुणी घरात एकटीच होती. त्याचवेळी परिसरातील तरूण विपीन माली हा तिच्या घरी आला. तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला.  त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याला प्रतिकार केल्यामुळे आरोपीने तरुणीला मारहाण करीत  तिचे कपडेही फाडले. दरम्यान तिने स्वतःची सुटका करून घेतली आणि टेरेसवर जाऊन आरडाओरड केली त्यामुळे तेथून पळ काढला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!