IndiaCrimeUpdate : धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्या विकृत तरुणाला गुजरात पोलिसांकडून अटक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला रांची पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे आरोपी गुजरातमधील कच्छ येथे राहणारा आहे. पोलिसांनी कच्छमधूनच मुसक्या आवळल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रांची पोलिसांच्या सूचनेवरुन गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचे नाव सगीर असे असून तो १२ वीचा विद्यार्थी आहे आणि कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा तहसीलमधील नाना कपाया गावात राहणारा आहे. पुढील तपासासाठी गुजरात पोलिस सगीरला रांची पोलिसांच्या हवाली करणार आहेत. दरम्यान सोशल मीडियावरून धोनीवर झालेल्या टीकेची दखल घेऊन धोनीच्या घरावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा १० धावांनी पराभव झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. म्हणून सोशल मीडियावरुन धोनीवर टीका केली जात होती. यातच एका विकृत नेटकाऱ्यांने चक्क धोनीच्या ६ वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. आरोपीने धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्काराची धमकी देणारे मेसेज केले होते. दरम्यान या बाबतच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर धोनीच्या कुटुंबाची परवानगी घेऊन पोलिसांनी रातू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी रांची पोलिसांनी सायबर सेलच्या एका विशेष पथकाची निर्मिती केली होती.या पथकाने हा मॅसेज टाकणाऱ्या आरोपीचा आयपी एड्रेस काढून तो गुजरात पोलिसांना दिला होता त्यानुसार गुजरात पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास चालू आहे.