BiharCrimeNewsUpdate : लज्जास्पद : बिहार मध्येही दलित महिलेवर सामूहिक बलात्कार , विरोध केल्याने पाच वर्षीय बालकाचा गाला दाबून खून

बिहारच्या पाटणा शहराच्या जवळ बक्सरमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या लहान मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले कि, सदर महिला दलित असून तिने या नराधमांना कुकर्म करण्यास विरोध दर्शविल्याने तिच्या पाच वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला आणि महिलेवर सामूहिक बलात्कार करून दोघांनाही एकत्र बांधून नदीत फेकले आणि ते पसार झाले . सदर महिला गंभीर जखमी असून तिच्यावर बक्सरच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणातील एकूण सात आरोपींपकी एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याशिवाय इतर दोन आरोपींची ओळख पटली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला शनिवारी आपल्या पचवर्षीय मुलाला सोबत घेऊन बँकेत निघाली होती. ती एकटी असल्याचे पाहून आरोपींनी तिच्याशी लगट करून तिच्या मुलाला हिसकावून घेतले. आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी तिने जेंव्हा या नराधमांना विरोध करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा आरोपींनी तिच्या मुलाचा गळा दाबून खून केला , तिच्यावर बलात्कार केल्यानंतर दोघांनाही एकत्र बांधून त्यांना नदीत फेकून दिले आणि आरोपी फरार झाले. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना बेशुद्धावस्थेत पडलेल्या महिलेची माहिती पोलिसांना दिली तेंव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले . याबाबत पोलिसांना माहिती देताना तिच्या पित्याने सांगितले कि , सकाळी पीडिता आपल्या मुलासोबत बँकेत चालली होती. सकाळी ११ वाजता तिला मी फोन केला तेंव्हा तिचा मोबाईलही बंद येत होता.
शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने सांगितले कि , आरोपींनी तिला घेरून तिच्यावर बलात्कार केला मुलाचा गळा दाबून खून केला आणि आम्हाला एकत्र बांधून नदीत सोडून ते पसार झाले. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांनी हि माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून एकाला अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत तर दोघांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. हाथरसच्या घटनेनंतर महिलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे आणखी घडताना दिसत आहेत.