Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : विवाहितेवर बलात्कार , चौघांना २० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

Advertisements
Advertisements
Spread the love

गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या चार दोषींना २० वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. निखिल मंडल (२६), राजेश डाकवा (३०), महादेव बारई (२८) आणि स्वरुप मिस्त्री (३५) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Advertisements

सदर बलात्काराची घटना २९ ऑगस्ट २०१८ घडली होती. पीडित महिला आपल्या पतीसह चामोर्शीनजीकच्या लालडोंगरीकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर बोलत असताना निखिल मंडल, राजेश डाकवा, महादेव बारई व स्वरुप मिस्राी हे चारजण तिथे आले आणि त्यांनी पती-पत्नीला मारहाण करुन त्यांचे फोटो काढले. त्यानंतर चार हजार रुपये दिले नाही तर फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन महिलेचा पती हा निखिल मंडल आणि स्वरुप मिस्त्री यांच्यासह पैसे आणण्यासाठी आपल्या घरी गेला. तेव्हा राजेश डाकवा व महादेव बारई यांनी त्या महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. परत आल्यानंतर निखिल मंडल यानेही तिच्यावर बलात्कार केला. शिवाय तिच्या पतीकडून चार हजार रुपयेही लुटले.

Advertisements
Advertisements

दरम्यान पीडितेच्या तक्रारीवरुन चामोर्शी पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षिदारांचे जबाब नोंदवून सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना भादंवि कलम ३२३ अन्वये प्रत्येकी १ वर्षांची शिक्षा, कलम ३८३ अन्वये ३ वर्षे शिक्षा आणि ४ हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्वये प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपये दंड आणि कलम ३७६ अन्वये २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिवाय पीडितांना २ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!