ट्विटरमर्दानी कंगनाला न्यायालयाचा दणका , शेतकऱ्यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आपल्या बेफाम आणि बेलगाम वक्तव्यामुळे कायम वादग्रस्त विधान करणारी बॉलिवूड अभिनेत्री ट्विटरमर्दानी कंगना राणावतविरुद्ध कर्नाटकातील एका कोर्टाने शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकातील क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला कंगना रनौत हिच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश तुमकूर कोर्टाने दिले आहेत. रमेश नाइल एल यांनी कंगना रनौत हिच्याविरोधात तक्रार दाखल केली असून कंगनाने आपल्या ट्विटमधून शेतकऱ्यांचा अपमान केल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1307957044075311105
मोदी सरकारकडून संसदेत शेतीसंदर्भात तीन विधेयके मंजूर करून घेतल्यानंतर या बिलांच्या विरोधात अनेक राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. या ट्विटवर पुन्हा ट्विट करताना कंगना रनौत म्हणाली, “पंतप्रधान मोदीजी, झोपलेल्याला जागं करता येतं, गैरसमज झालेल्याला समजावून सांगितले जाऊ शकते. मात्र, झोपण्याचं सोंग घेणाऱ्याला, समजून न घेण्याचा अभिनय करत असेल त्याला आपण समजावून सांगण्याने काय फरक पजणार? होईल का? हे तेच दहशतवादी आहेत, सीएएमुळे एकाचंही नागरिकत्व गेले नाही. मात्र, यांनी रक्ताचे वाट वाहिले. कंगनाच्या या ट्विटवर भरपूर टीका झाली. त्यानंतर कंगनाने २१ सप्टेंबर रोजी स्पष्टीकरण दिले. ती म्हणाले, “ज्याप्रमाणे श्रीकृष्णाकडे नारायणी सैना होती, तसाच पप्पूकडे चंपू सेना आहे, जिला फक्त अफवांच्या आधारे लढायचं माहिती आहे. हे मी माझे मूळ ट्विट आहे, जर कोणी मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असं सिद्ध केलं तर, मी माफी मागून ट्विटर कायमचं सोडेल. आता याच ट्विटमुळे कंगना अडचणीत आली आहे.