HathrasGangRapeCase : हाथरस मध्ये आज : पोलिसांच्या कैदेतून सुटका करा , पीडितेचे कुटुंब अलाहाबाद हाय कोर्टात , मुख्य आरोपीने लिहिली हाथरस पोलिसांना चिट्ठी …

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील कथित सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील पीडित कुटुंबाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली असून पोलीस प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या बंदीमुळे आपल्याला आपल्याच घरात कैदेत ठेवण्यात आल्याचे म्हणत पीडित कुटुंबानं या कैदेतून सुटका करण्याची मागणी करत त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पोलीस प्रशासनानं घातलेल्या बंदीमुळे कुटुंबाला मोकळ्या वातावरणात श्वासही घेता येत नाही. त्यामुळे लोकांना भेटण्याचं आपल्याला स्वातंत्र्य असावं आणि आपलं म्हणणं मोकळ्या पद्धतीनं मांडता यावं, अशी मागणी करणारा अर्ज पीडित कुटुंबानं न्यायालयासमोर दाखल केला आहे .
दरम्यान पोलिसांनी घातलेल्या बंदीमुळे लोकांना आम्हाला भेटताही येत नाही. कुटुंबाला मोकळेपणानं आपलं म्हणणंही मांडता येत नाही. तसंच कुटुंबीयांना घराबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंबावर लादण्यात आलेली ही बंदी हटवणं गरजेचं असल्याचं या अर्जात म्हटलं गेलं आहे. याचिकाकर्ते सुरेंद्र कुमार यांनी केलेल्या दाव्यानुसार, पीडित कुटुंबाकडून हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. पीडित कुटुंबानं फोन करून आपल्याकडे कोर्टाच्या हस्तक्षेपाची मागणी केल्याचं सुरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर तत्काळ सुनावणी करण्यात यावी, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.
पीडित मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबाला दिलेल्या वागणुकीवरून स्थानिकांत रोष आहे. या घटनेला मिळालेल्या राजकीय वळणामुळे उत्तर प्रदेश सरकारनं पीडित कुटुंबाची सुरक्षा आणखीन वाढवली आहे. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दोन पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे . यासोबतच त्यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टर लावण्यात आलाय. येणाऱ्या – जाणाऱ्या प्रत्येकाचं नव आणि पत्ता पोलिसांकडून नोंदवण्यात येतोय. याशिवाय घरात ठिकाठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. घरातून बाहेर पडण्यापूर्वी पीडित कुटुंबाला पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागत आहे. तसंच गावातही अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
Creating a narrative that defames a woman’s character and holding her somehow responsible for crimes committed against her is revolting and regressive.
A heinous crime has been committed at Hathras, leaving a 20-year-old Dalit woman dead.
1/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 8, 2020
दरम्यान पुन्हा एकदा काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावर केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि , अशा कथा रचून जे स्त्रियांच्या चारित्र्याला हीं लेखतात आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत तिलाच जबाबदार ठरवतात हे प्रतिगामीपणाचे लक्षण आहे. हाथरस मध्ये गंभीर गुन्हा घाला असून ज्यामध्ये २० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. शिवाय तिच्या मृतदेहाला तिच्या पालकांची संमती न घेताच जाळण्यात आले. हि मुलगी न्याय मिळवण्यासाठी पात्र आहे बदनामीसाठी नाही . तिच्या ट्विटला उत्तर देताना बॉलिवूड अभिनेत्री स्वर भास्करनेही संमती दर्शविणारे ट्विट केले आहे.
मुख्य आरोपीची हाथरस पोलिसांना चिट्ठी
दरम्यान हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूर याने हाथरस पोलिसांना चिट्ठी लिहिली असून त्यात त्याने म्हटले आहे कि , पीडितेशी आपली मैत्री होती मात्र तिच्या कुटुंबियांना आमची हि मंत्री पसंत नव्हती. त्याने चिट्ठीत पुढे कबुली दिली आहे कि , घटना घडली त्या दिवशी पीडितेला भेटण्यासाठी मी गेलो होतो. पण पीडितेच्या भावाने आणि आईने मला तेथून जाण्यास सांगितले त्यानुसार मी तेथून निघून गेलो. नंतर मला गावातील लोकांकडून समजले कि , तिच्या भावाने आणि आईने तिला आमची मैत्री पसंत नव्हती म्हणून मारले आहे. त्याने म्हटले आहे कि , आम्ही अधून मधून भेटताही होतो पण तिच्यासोबत आपण काहीही गैर केले नाही. पीडितेच्या भावाशीही आपले काही वेळा बोलणे झाले आहे. मला आणि इतर तीन मुलांना मुद्दाम यात अडकवले जात आहे. विशेष म्हणजे या पत्रावर या चारही आरोपींनी आपले अंगठे मारले आहेत.
या चिट्ठी प्रकरणावर बोलताना पीडितेच्या वडिलांनी एनडीटीव्ही इंडियाशी बोलताना म्हटले आहे कि , हे साफ खोटे आहे. आम्ही आमच्या मुलीला गमावले आहे. आणि खोटे नाटे सांगून आमच्यावर चिखलफेक करीत आहेत. त्यांनी आमच्यावर लावलेले आरोप पूर्णतः खोटे आणि निराधार आहेत. आम्हाला कुठल्या प्रकारची नुकसान भरपाई अथवा पैसे नको आहे. आम्हाला फक्त न्याय पाहिजे.