UttarPradeshCrime : पुन्हा एकदा उत्तर प्रदेश : अल्पवयीन गरोदर मुलीचा बापाने आणि भावानेच केला शिरच्छेद !!

देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येचे प्रकरण गाजत असतानाच बलरामपूर , अलिगढ येथील घटनांचे पडसाद उमटत असतानाच हाथरसनंतरही उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. याच गुन्ह्यांच्या मालिकेत पित्यानेच गर्भवती असलेल्या आपल्या १४ वर्षीय मुलीची हत्या केली आहे. बाळाच्या पित्याचे नाव सांगण्यास नकार देत असल्याने मोठ्या मुलाच्या मदतीने पित्याने हि हत्या केली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मुलीने ज्याच्यासोबत नात्यात आहे त्याच्यासोबत लग्न करावं असं आरोपीचं म्हणणं होतं. हत्या केल्यानंतर आरोपीने शीर कापून मृतदेह नाल्यात टाकून देण्यात आला होता,” असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे. हत्येनंतर मुलीच्या पित्याला अटक करण्यात आली. तर भाऊ फरार आहे. पोलीस सध्या तपास करत असून मुलीसोबत संबंध असणाऱ्याचाही शोध घेतला जात आहे.
याबाबत पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , मंगळवारी सकाळी गावकऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतदेहाचं शीर कापण्यात आलं होतं. याबाबत गावकऱ्यांनीच पोलिसांना कळवलं,” अशी माहिती पोलिस अधीक्षक एस आनंद यांनी दिली आहे. “तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध लावला असता , मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. मुलीचे कोणासोबत तरी संबंध असल्याचा संशय होता. प्राथमिकदृष्ट्या हे ऑनर किलिंग दिसत असून मुलीच्या वडिलांची चौकशी करण्यात आली. दरम्यान आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला मुलीची हत्या करण्यात आली होती. कुटुंबाने पोलिसांना याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. पोलीस अधिक्षकांनी सांगितल्यानुसार, “मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलगी गर्भवती होती. आपण जेव्हा तिला यासाठी कोण जबाबदार आहे असं विचारलं तेव्हा तिने काहीही सांगण्यास नकार दिला”. या संतापात पित्याने मुलीची गळा दाबून हत्या केली.