Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : माणसं नव्हेतच !! हे तर माणसाच्या रूपातील जनावरेच …भावानेच केले बहिणीवर अत्याचार

Advertisements
Advertisements
Spread the love

काही दिवसांपूर्वी एका घटनेत मावशीच्या नवऱ्याने तर दुसऱ्या एका घटनेत काकाने अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडलेल्या असताना संगमनेर तालुक्यात चुलत भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे .  या घटनेत  चुलत भावाने बहिणीवर सातत्याने अत्याचार केले. यातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आरोपी भावावर अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Advertisements

दरम्यान ३ आक्टोबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने गणपती सणापासून मावशीकडे पाहुणी म्हणून येऊन राहिलेल्या ८ वर्षीय मुलीवर काकानेच  वेळोवेळी अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना जांभुळपाडा (चावे )येथे घडल्याचे निदर्शनास आले होते तर  चंद्रपूर जिल्ह्यात 12 वर्षाच्या मुलीवर  चुलत काकाने अत्याचार केल्याची घटना गोंडपिंपरी तालुक्यातील येनबोथला गावात घडल्याचे उघडकीस आले होते . मुलीच्या पित्याने हे प्रकरण पोलिसात नोंदविल्यानंतर पोलिसांनी २६  वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे. संतापजनक बाब म्हणजे घरात आजोबाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असताना काकाने १२ वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली आणि तिला ओढत घराशेजारी असलेल्या बांबूच्या रांजीत नेले व तिथेच तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान  नात्यातीलच व्यक्ती जर आयुष्य उद्धवस्त करणार असेल तर मुलींनी समाजात जगायचं कसं, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे . चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे माणसे नव्हेतच हि … हि तर माणसांच्या रूपातील जनावरेच आहेत असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!