MadhyapradeshCrimeUpdate : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडीओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना , एकास अटक

एकीकडे उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना च आता मध्य प्रदेशाच्या दमोहमध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे संतापजनक घटनेत दोघा जणांनी कॅमेऱ्यासमोर तिच्यावर बलात्कार करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ ग्रामस्थांच्या मोबाइलवर शेअर केल्यानंतर खळबळ माजली आहे. मुलीवरील बलात्काराचा व्हिडिओ काढणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केला आहे, त्या आरोपींची ओळख देखील पटवण्यात आली आहे. तसेच मोबाइलवरून व्हायरल व्हिडिओ डिलिट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २२ सप्टेंबरला आरोपींनी पीडित मुलीवर तिच्या घरातच बलात्कार केला आणि व्हिडिओ काढून २० वर्षीय आरोपीने मुलीला ब्लॅकमेल केले. शुक्रवारी दमोह शहरापासून ७० किलोमीटर दूर असलेल्या गावात हा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी शुक्रवार आणि शनिवारी रात्रीपर्यंत २५ जणांच्या मोबाइलमधून हा व्हिडिओ डिलिट केला आहे. सायबर सेलची मदत घेतली जात आहे. एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत.