IndiaNewsUpdate : कृष्ण जन्मभूमीसाठी मशिदीची जागा देण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

कृष्ण जन्मभूमी असलेल्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, मथुरा दिवाणी कोर्टानं शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. खटला दाखल करण्यासाठी न्यायालयाने पूजास्थळ अधिनियम १९९१अंतर्गत उल्लेख चुकीचा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. ऑक्टोबर १९६८ मध्ये कृष्णा जन्मभूमी सेवा संघ आणि शाही मशीद ईदगाह सोसायटी यांच्यात या जागेचा मालकी नसतानाही करार झाला होता. नंतर ही जागा शाही ईदगाह मशीदीसाठी देण्यात आला होती, असा उल्लेख याचिकेत असल्यानं ती फेटाळण्यात येत असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
मथुरेतील कृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जागेची मालकी मिळण्याची आणि शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकेद्वारा करण्यात आली होती. भगवान कृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवाट, मथुरा बाजार शहर येथील जागेसाठी याचिकाकर्ती रंजना अग्निहोत्री आणि इतर सहा भाविकांनी ही याचिका दाखल केली होती. कृष्ण जन्मभूमीच्या जागेवर मुघलकाळात कब्जा करण्यात आला होता. नंतर या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली होती. आता याच जागेवरील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
दरम्यान मथुरेतील कृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जागेची मालकी मिळण्याची आणि शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकेद्वारा करण्यात आली होती. भगवान कृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवाट, मथुरा बाजार शहर येथील जागेसाठी याचिकाकर्ती रंजना अग्निहोत्री आणि इतर सहा भाविकांनी ही याचिका दाखल केली होती. कृष्ण जन्मभूमीच्या जागेवर मुघलकाळात कब्जा करण्यात आला होता. नंतर या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली होती. आता याच जागेवरील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.