MaharashtraCoronaUpdate : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची बाधा

काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2020
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसंच कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.
कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रारंभी होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं मात्र, त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळेठाण्यातील ज्यूपीटर हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गेले काही दिवस एकनाथ शिंदे सातत्याने कोविड 19 केअर हाँस्पिटलमध्ये पीपीई कीट घालून पहाणी करत होते. याच दरम्यान त्यांना कोविड 19 चा संसर्ग झाल्याची शक्यात व्यक्तं केली जात आहे.
शिवसेनेचे डोंबिवलीचे माजी महापौर देवळेकर यांचं निधन
दरम्यान, कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. देवळेकर यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते त्यातून बरेही झाले होते. पण यादरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. देवळेकर यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे.