Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा

Advertisements
Advertisements
Spread the love

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एका बाजूला पडला असून याची मैत्रीण रियामुळे  ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसांत प्रत्येकाला जबाब नोंदवण्यासाठी हजेरी लावावी लागणार आहे. दीपिका पादुकोण मुंबईत नाही, त्यामुळे ती २५ सप्टेंबरला एनसीबीसमोर जबाब नोंदवू शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना उद्या एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान २६ सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर होतील.

Advertisements

दरम्यान या आधी मंगळवारी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि KWAN टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांनाही समन्स बजावले होते, परंतु करिश्माची तब्येत ठिक नसल्यामुळे एजन्सीसमोर हजर होऊ शकली नाही. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले होते की, गरज भासल्यास दीपिकाला चौकशीसाठी बोलवलं जावू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित अमली पदार्थांविषयी व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट एजन्सीच्या तपासांतर्गत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!