AurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना

कोरोनाच्या संकटकाळात जेलबाहेर आलेले काही गुन्हेगार पोलिसांना ठरताहेत वरचढ
हर्सूल कारागृहातून सुटलेले ३१४ आरोपींचे रेकॉर्ड तपासणे सुरू
पोलिसआयुक्त निखील गुप्तांचा खुलासा.
औरंंंगाबाद : शहर पोलिसांकडून प्राॅपर्टी आॅफन्स, शरीरविरुध्द गंभीर इजा करणारे असे जे कोरोनामुळे बाहेर आलेले गुन्हेगार आहेत त्यांची यादी शहरातील प्रत्येक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेकडे देण्यात आलेली आहे. या यादीतील काही गुन्हेगार सर्तक झाले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशा गुन्हेगारांविरुध्द अत्यंत कठोर पावले उचलण्यात येतील अशी माहिती पोलिसआयुक्त डाॅ निखील गुप्ता यांनी “महानायक” शी बोलतांना दिली.
कोरोनाच्या संकटकाळात हर्सूल कारागृहातून ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेले ३१४ रेकॉर्डवरील आरोपींना गृहमंत्र्यांच्या आदेशाने बाहेर सोडण्यात आले आहे. कारागृहाबाहेर आलेले आरोपी पोलिसांना वरचढ झाले असून कारागृहातून सुटलेल्या ३१४ आरोपींचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेलमधील कैद्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या आदेशाने कारागृहात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेल्याकैद्यांना कारागृहाबाहेर सोडण्यात आले होते. त्यामध्ये औरंगाबाद शहरातील २१३ आरोपी असून ग्रामीण भागातील १०१ आरोपी आहेत. कारागृहाबाहेर आलेल्या आरोपीमध्ये काही अल्पवयीन आरोपी देखील असल्याचे पोलिसआयुक्तांनी सांगितले. कोरोनामुळे कारागृहाबाहेर आलेल्या आरोपींनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा एकदा गुन्हेगारीचा मार्ग स्विकारत गेल्या तीन ते चार महिन्याच्या काळात शहराच्या विविध भागात चो-या, घरफोड्या, वाहन चोरी, जबरी चोरी करण्यास सुरूवात केली आहे.तसेच वाहन चोर्या रोखण्यासाठी गुन्हेशाखाने रस्त्यावर वाढत्या वाहन चो-या रोखण्यासाठी गुन्हेशाखा पोलिसांची सात पथके तैनात करण्यात आल्याचे आदेश गुन्हेशाखेला दिलेले आहेत ही सात पथके शहराच्या विविध भागात जाऊन संशयीत वाहनांची तपासणी करतील
असे शेवटी ते म्हणाले