MaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षण : अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात विंनती अर्ज

Maharashtra Minister & Congress leader Ashok Chavan meets NCP chief Sharad Pawar in Mumbai. He says, "A petition has to be filed in Supreme Court for vacating its interim order (on Maratha reservation). The Chief Minister has discussed the matter with senior leaders." pic.twitter.com/YeDlEdLai7
— ANI (@ANI) September 21, 2020
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरीधात आपला तीव्र असंतोष व्यक्त करून तीव्र आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान अशा परिस्थितीतून काय मार्ग काढत येईल यावरून सरकार पक्षात मोठा खल चालू आहे . हा असंतोष दूर करण्यासाठी एक पर्याय म्हणून ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर मराठा समाजाकडून मोठी टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या बुधवारी बैठक घेतली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समाधानही व्यक्त केलं. या विषयावरून शनिवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठकही पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने मराठा आरक्षणासंदर्भात काय पावलं उचलता येतील याबाबत चर्चा झाल्याचे समजले होते. दरम्यान आज सरकारतर्फे अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार अर्ज दाखल करण्यात आला आहे.