MaharashtraNewsUpdate : शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनाही कोरोनाची बाधा

नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान
मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 22, 2020
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या पाच दिवसांत एकापाठोपाठ एक अशा चार मंत्र्यांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री आणि धारावी मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी स्वत:च ट्विटरच्या माध्यमातून करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. ‘आज तपासणीदरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या’, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या आधी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा करोना चाचणी अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही करोनाने गाठले. या तिन्ही मंत्र्यांवर सध्या उपचार सुरू असतानाच वर्षा गायकवाड यासुद्धा करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. गायकवाड यांची प्रकृती चांगली आहे. याबद्दत त्यांनीच माहिती दिली आहे.